Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१४ रुग्ण वाढीसह ४० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 09:48 PM2021-06-01T21:48:29+5:302021-06-01T21:50:25+5:30
Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटकर्क
ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या ९ हजार २८८ झाली . तर आतापर्यंत रुग्ण संख्या पाच लाख १६ हजार ९०३ नोंदली आहे.
ठाणे शहर परिसरात आज १२४ रुग्णांची वाढ होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख २९ हजार १०४ रुग्णांसह एक हजार ९०४ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीला ११५ रुग्णांची वाढ तर २० मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख ३३ हजार १६० झाली असून मृतांची संख्या आता दोन हजार २५ नोंदली आहे.
उल्हासनगरात ३३ रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. येथील मृतांची संख्या आता ४७४ झाली असून रुग्ण संख्या २० हजार ४८८ नोंद झाली आहे. भिवंड शहरात सहा रुग्ण आढळले असता एक मृत्यू झाला आहे. या शहरात १० हजार ४६४ रुग्णांसह ४४० मृतांची नोंद करण्यात आली. मीरा-भाईंदरलाही ५६ रुग्णांच्या वाढीसह आज तीन मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३७ झाली असून मृतांची संख्या एक हजार २७८ नोंद झाली.
अंबरनाथ शहरात १९ रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता १९ हजार ३१५ झाली. तर ४०७ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला २५ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. एकूण २० हजार ६०९ रुग्ण संख्या झाली असून २१५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ६० रुग्ण आढळले असून सहा मृत्यू झाले आहेत. आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात ३६ हजार ६३३ रुग्णांसह ८९४ मृतांची नोंद करण्यात आली.