ठाण्यातील काँग्रेसला गळतीची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 02:41 AM2016-09-18T02:41:58+5:302016-09-18T02:41:58+5:30

संजय घाडीगावकर यांनी अपक्ष नगरसेविकेसह भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

Thane interference in Thane Congress | ठाण्यातील काँग्रेसला गळतीची बाधा

ठाण्यातील काँग्रेसला गळतीची बाधा

Next


ठाणे : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी अपक्ष नगरसेविकेसह भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाच्या प्रभाग क्र. ४७ अ च्या नगरसेविका मेघना हंडोरे यांनीदेखील आपल्या पतीसमवेत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे ठाण्यात आता मोठ्या प्रमाणात पक्षाला गळती लागली असून त्यांच्या प्रस्थापित नगरसेवकांची संख्या घटू लागली आहे.
मेघना हंडोरे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार संजय केळकर, संजय घाडीगावकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच घाडीगावकर यांनी काँग्रेसवर टीका करून पक्ष सोडला होता. त्यानंतर, आता हंडोरे यांनीदेखील पक्षाला अखेर हात दाखवला आहे. ही गळती आजपासूनची नसून काँग्रेस वाढण्याऐवजी कमीकमी होत आहे. फाटक दाम्पत्याने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकलीदेखील. परंतु, काहींनी आपल्यावर कारवाई होऊ नये, त्यामुळे पक्षात राहून शिवसेनेशी संधान साधले आहे. त्यात आता पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसने मनोज शिंदे यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी सर्वांना सामावून घेण्यासाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. परंतु, या कार्यकारिणीवर आक्षेप घेऊन अनेक निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते ठाण्यात आले असता, येथील निष्ठावान नगरसेवक नारायण पवार यांनी थेट पक्षातील श्रेष्ठींवरच तोफ डागली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यात आता नगरसेवकांचे इतर पक्षांत आउटगोइंग सुरू झाल्याने काँग्रेससमोर गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करण्याऐवजी भाजपात प्रवेशासाठी चुरस आहे.
२०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला रवींद्र फाटक यांनी जोरदार धक्का देऊन पत्नी जयश्री फाटकसह दीपक वेतकर, राजा गवारी, मीनल संख्ये, कांचन चिंदरकर, मनजित कौर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Web Title: Thane interference in Thane Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.