ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अंधारात, अचानक वीज गायब झाल्यानं जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 10:03 PM2017-10-08T22:03:12+5:302017-10-08T22:03:22+5:30
विजांच्या कडकडाटासह वादळवाऱ्याचा अवेळी पावसाने आज सायंकाळपासून ठाणे जिल्ह्याला चांगलेच झोडपले. या दरम्यान ठिकठिकाणचा विद्युत पुरवठा बंद झाला.
ठाणे : विजांच्या कडकडाटासह वादळवाऱ्याचा अवेळी पावसाने आज सायंकाळपासून ठाणे जिल्ह्याला चांगलेच झोडपले. या दरम्यान ठिकठिकाणचा विद्युत पुरवठा बंद झाला. उल्हासनगरला वीजपुरवठा होणाऱ्या मोहना गावाजवळील नदीत विजेची तार तुटल्यामुळे वीज खंडित झाली. आतापर्यंत काम सुरू असल्यामुळे पुरवठा सुरू झालेला नाही. वीज पडून वीजवाहिनी तार तुटल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत होणार नाही.
करवाचौथ - चंद्रदर्शन लांबणीवर
आकाशात काळे ढग दाटून आल्यामुळे चंद्राचे आतापर्यंत दर्शनही झाले नाही. त्यात करवाचौथ असल्यामुळे चंद्र होणे ही अपेक्षित होते, पण तसे न झाल्यामुळे महिलांच्या उपास सोडण्याच्या वेळेत विलंब होत आहे. नैसर्गिक परिस्थिती असतानाही महिलांची परीक्षा पाहिली जात असल्याचे एेकायला मिळत आहे.