ठाण्याचा पारा ३९ अंश
By Admin | Published: May 17, 2016 04:08 AM2016-05-17T04:08:52+5:302016-05-17T04:08:52+5:30
एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने राज्यासह ठाणे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
ठाणे : एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने राज्यासह ठाणे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात दुसरीकडे सुर्यानेदेखील त्यात भर घातल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी तो आग ओकत असून ठाणे शहरात मार्चपासून आतपर्यंत चार वेळा तापमानाने ४० अंशाहून अधिकची पातळी गाठली असल्याची माहिती समोर आली
आहे. यामध्ये २३ मार्च हा या वर्षाचा सर्वाधिक उष्ण दिवस नोंदवला गेला आहे.
विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात तब्बल दोन दिवस तापमान ४० अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, त्याचवेळी मे महिन्यात राज्यात उष्णतेचा पारा चढला असतांना ठाण्यातही ३९ अंशांवर गेले आहे. त्यातही मागील अडिच महिन्यात तब्बल ४९ दिवस ३५ अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात यंदा उष्म्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागपूर, बुलढाणा आदी ठिकाणी तापमान अगदी ४५ अंशाच्या पार झाले आहे. त्याचवेळी ठाण्यातही उष्णता प्रचंड वाढली आहे. नागरिक सकाळी अकरानंतर घराबाहेर पडत नाहीत, तोच सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.