ठाणे मोबाईल चोरी: सीसीटीव्हीतील चित्रण पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 09:31 PM2017-07-18T21:31:09+5:302017-07-18T21:31:09+5:30
आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 18 : शहरातील चरई भागातील ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ या दुकानातून चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे ...
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 18 : शहरातील चरई भागातील ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ या दुकानातून चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे १० लाख १७ हजारांचे ७१ मोबाइल लांबविल्याची घटनेचे चित्रण एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून ते नौपाडा पोलिसांच्या हाती लागले आहे. आता या चित्रणच्या आधारावर या चोरीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रविवारी पहाटेच्या सुमारास जुन्या मुंबई रस्त्यावरील भरत जैन यांच्या दुकानाचे तोडून चोरटयांनी ही चोरी केली. त्यांनी कपाटातील सुमारे ७१ मोबाइल लंपास केले. या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले असून यात दोघा जणांचा समावेश असल्याचे स्पष्ट दिसते. अवघ्या काही मिनिटांमध्ये अत्यंत चलाखीने हे दोघेही आपल्या बॅगांमध्ये मोबाईल भरतांना यात पहायला मिळते. रेनकोट परिधान केलेले २० ते २५ वयोगटातील हे तरुण असल्याचे यात आढळले आहे. ते दोघेच होते की त्यांच्याबरोबर अन्य कोणती टोळी होती, याचाही तपास सुरु असून त्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींची पडताळणी केली जात असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, विशाल बनकर आणि उपनिरीक्षक शिरीष यादव या तीन अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तपास सुरू आहे. आतापर्यंत या परिसरातील आठ ते दहा जणांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
https://www.dailymotion.com/video/x8458qd