ठाणे पालिका आयुक्तांचा कारवाईचा हातोडा
By admin | Published: May 12, 2017 03:00 AM2017-05-12T03:00:24+5:302017-05-12T03:00:24+5:30
ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर आक्रमक झालेले पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी संध्याकाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर आक्रमक झालेले पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी संध्याकाळी त्या भागातील गाळे तोडून आपल्या आक्रमकतेचे प्रत्यंतर दिले. नंतरही पुढे जाऊन त्यांनी स्टेशन परिसरात बेशिस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षाचालक आणि बाईकस्वारांनाही कारवाईचा प्रसाद दिला. आयुक्तांनी कॉलर धरल्याचा आणि त्यांच्या रक्षकांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करून नंतर रिक्षाचालकांनी बंद पाळला. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी सायंकाळी गाळेधारकांवर कारवाई केली. उपायुक्त माळवी यांना ज्या परिसरात बुधवारी रात्री मारहाण झाली होती, त्या ठिकाणी पालिकेच्या पथकाने जाऊन आधी गाळ््यांना सील ठोकले. तोवर सर्व गाळे पटापट बंद झाले होते.
मात्र ज्या गाळेधारकाच्या गल्ल्यावरून माळवी यांची चकमक उडाली, तो वगळता अन्य गाळ््यांचे सील नंतर अधिकाऱ्यांनी काढले. नंतर तेथे आलेले जयस्वाल यांनी मात्र सर्व गाळे तोडण्याचे आदेश दिले. आम्हाला त्याची पूर्वकल्पनाही
दिली नाही आणि आतील
वस्तू बाहेर काढण्याची संधी दिली नाही, असा गाळेधारकांचा आरोप होता.