ठाणे, पालघर जि.प. निवडणूक २८ जानेवारीला
By admin | Published: January 6, 2015 02:50 AM2015-01-06T02:50:02+5:302015-01-06T02:50:02+5:30
ठाणे आणि नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेची तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांची निवडणूक २८ जानेवारीला होणार आहे.
मुंबई : ठाणे आणि नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेची तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांची निवडणूक २८ जानेवारीला होणार आहे. अन्य जिल्ह्णांमधील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्तपदांची निवडणूकही त्याच दिवशी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले. याचा निकाल ३० जानेवारीला जाहीर करण्यात येतील.
८ ते १३ जानेवारी दरम्यान (सुटीचा दिवस वगळून) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्राची प्रत व जात प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
छाननीच्या वेळी मूळ जात
प्रमाणपत्र व जातप्रमाणपत्राचे वैधता प्रमाणपत्र तपासणीकरीता सादर करणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता संबंधित क्षेत्रात सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू झाली असून ती ३० जानेवारीपर्यंत राहील.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,
शहापूर, कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड तर पालघर जिह्यातील वसई, तलासरी, डहाणू, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि पालघर या पंचायत
समित्यांच्या पोटनिवडणुका होणार असून रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, गडचिरोली या जिल्ह्णांमध्ये जिल्हा परिषदेच्या काही
गटांची पोटनिवडणूक होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)