इफेड्रीन प्रकरणी ठाणे पोलीस गोव्याला रवाना

By admin | Published: May 1, 2016 01:03 AM2016-05-01T01:03:49+5:302016-05-01T01:03:49+5:30

इफेड्रीनप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन स्थळांची नावे पुढे येत आहेत. त्यातच गोव्याचे नाव पुढे आले आहे, त्यामुळे ठाणे शहर पोलीसएव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचा माजी संचालक

Thane Police leave Goa for epidemic cases | इफेड्रीन प्रकरणी ठाणे पोलीस गोव्याला रवाना

इफेड्रीन प्रकरणी ठाणे पोलीस गोव्याला रवाना

Next

ठाणे : इफेड्रीनप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन स्थळांची नावे पुढे येत आहेत. त्यातच गोव्याचे नाव पुढे आले आहे, त्यामुळे ठाणे शहर पोलीसएव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचा माजी संचालक मनोज जैनला घेऊन तेथे रवाना झाले आहेत. तसेच आता पुढील लक्ष्य जय मुखी आणि किशोर राठोड हे दोघे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्य सूत्रधार पुनीत श्रींगीसह कंपनी संचालक मनोज जैन आणि हरदीपसिंग या तिघांना पकडले. याचदरम्यान, अमेरिकेच्या पथकानेही ठाणे पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय ड्रग्जचे रॅकेट असण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर अभिनेत्री ममता कुलकर्णीचा माजी पती कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांचेही नाव पुढे आले.

Web Title: Thane Police leave Goa for epidemic cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.