ठाण्यातील पोलिसाची जळगावात आत्महत्या
By admin | Published: January 17, 2015 05:39 AM2015-01-17T05:39:08+5:302015-01-17T05:39:08+5:30
ठाणे जिल्ह्यातील खेरवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाळू हिंमत मंडपे (३०) यांनी डोमगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
जळगाव : ठाणे जिल्ह्यातील खेरवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाळू हिंमत मंडपे (३०) यांनी डोमगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
खेरवाडी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे बाळू यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. बाळू २००६मध्ये ठाणे पोलीस दलात भरती झाला होता. त्यानंतर त्यांची नियुक्ती खेरवाडीत झाली होती. १५ दिवसांपूर्वी मंडपे सुट्टी घेऊन पत्नी व मुलासह डोमगावला आले होते. शुक्रवारी दुपारी आई-वडील व कुटुंबीय शेतात गेले असताना त्यांनी दोराच्या साहाय्याने गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपविले. दुपारी चार वाजता मंडपे कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत सुसाईड नोट मिळाली. (प्रतिनिधी)