ठाणे कारागृहातील कैदयाची आत्महत्या
By admin | Published: September 19, 2016 10:56 PM2016-09-19T22:56:02+5:302016-09-19T22:56:02+5:30
येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सिराज अलम रमजानअली शेख (27) कैदयाने आत्महत्या केल्याची घटना आज रात्री 8 वा च्या सुमारास घडली
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १९ : येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सिराज अलम रमजानअली शेख (27) कैद्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री 8 वा च्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले.
मुंबईच्या बोरीवलीतील एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणात त्याला 2015 मध्ये अटक झाली होती. तळोजा कारागृहातून त्याला ठाणो कारागृहात काही दिवसांपूर्वीच आणण्यात आले होते. त्याने आपल्या कोठडीतच गळफास लावून घेतल्याचे आढळले. त्याची तातडीने वैद्यकीय अधिका:यांमार्फत तपासणी करण्यात आली मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.