ठाणे रडारवर!

By Admin | Published: April 19, 2015 02:02 AM2015-04-19T02:02:55+5:302015-04-19T02:02:55+5:30

शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांसह एकूण ८४ ठिकाणे संवेदनशील असून, त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता पोलिसांनी केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे.

Thane radar! | ठाणे रडारवर!

ठाणे रडारवर!

googlenewsNext

१२ ठिकाणे अतिरेक्यांसाठी मोक्याची : पाहणी करून पोलिसांनी वाढवली सुरक्षा
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांसह एकूण ८४ ठिकाणे संवेदनशील असून, त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता पोलिसांनी केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे. यातील १२ ठिकाणे ही प्रामुख्याने अतिसंवेदनशील असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठाणे शहर, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, वागळे इस्टेट अशी पाच परिमंडळे असलेले हे पोलीस आयुक्तालय आहे. मुंबईपाठोपाठ महत्त्वाचे असलेले ठाणेही आतंकवाद्यांच्या रडारवर आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी आतापर्यंत झालेल्या विविध हल्ल्यांचा अभ्यास करून आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील गर्दीस्थळांसह अन्य ठिकाणांची पाहणी केली. त्यातील१२ ठिकाणे अतिसंवेदनशील आढळली आहेत. या पाहणीबाबत दुजोरा देत ठाणे शहरचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी हल्ल्यांच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेतली गेली असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. विशेष खरबदारी म्हणून शहर पोलिसांनी दिवसरात्र सुरक्षा वाढवली असून ज्या ठिकाणी धोका जास्त आहे, त्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून त्याचा अहवाल दररोज त्यांच्या वरिष्ठांना देणे बंधनकारक केले आहे. तसेच काही ठिकाणी विशेष तैनात केलेल्या लोकांना क्यूआरटी पथकाप्रमाणे प्रशिक्षण दिले गेले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

संवेदनशील ठिकाणे
परिमंडळए*बी*सी*एकूण
ठाणे शहर०५०२०६१३
भिवंडी०१-१२१३
कल्याण०३०६१६२५
उल्हासनगर०२०११०१३
वागळे०१०३१६२०
एकूण१२१२६०८४

Web Title: Thane radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.