ठाणे: ताटातूट झालेल्या आजींना रेल्वेकडून मदत, घरी परण्यासाठी काढून दिले तिकीट; खर्चासाठीही दिले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:43 AM2017-09-04T02:43:32+5:302017-09-04T02:44:02+5:30
ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली.
पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. त्यानंतर ती आजीबाई कसेबसे ठाणे रेल्वे स्थानकात आली. याचदरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिच्या सुनेचा शोध घेतला. पण, ती शोधून न सापडल्याने अखेर तिला मदत म्हणून रेल्वे तिकीट आणि खर्चाला पैसे देऊन एक्सप्रेसमध्ये बसवून घरी धाडले.
लक्ष्मीबाई (नाव बदलेले आहे) आणि त्यांची सून या दोघी तळोजा जेलमध्ये न्यायबंदी असलेल्या मुलाची शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्याची तारीख असल्याने त्याला भेटण्यासाठी सकाळी ठाण्यात आल्या. दुपारी भेट झाल्यानंतर दोघीही पायी ठाणे रेल्वे स्थानकाकडे घरी जाण्यासाठी परताना त्या ठाणे बाजारपेठेत झालेल्या गर्दीत रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला गेल्या. याचदरम्यान, गर्दीतून आजीबाई सुनेच्या दिशेने जात असताना, अचानक दोन-तीन बस आणि एका मागून एक आल्याने काही वाहनांमुळे त्यांची ताटातूट झाली. गर्दी कमी झाल्यावर आजीबार्इंनी सुनेचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने मोठ्या धीराने त्यांनी लोकांना विचारत कसेबसे ठाणे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत सांयकाळचे ५.३० वाजले होते. सून रेल्वे स्थानकात असेल म्हणून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने केविलवाण्या अवस्थेत असलेल्या आजीबार्इंना रेल्वे प्रशासनाने धीर देऊन विचारपूस केली. त्यावेळी आजीबाई अक्कलकोट येथे राहणाºया असल्याचे समोर आले.
आजीबार्इंच्या कपड्यांवरून त्या गरीब घरातील असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडील एका पिशवीत पाण्याची बाटली आणि अवघी दहा रुपयांची नोट होती. याचदरम्यान, अक्कलकोटला जाण्यासाठी रात्री १०.३५ ची कुर्ला- कोईम्बतूर एक्सप्रेस असल्याने तब्बल पाच तासांचा मुक्काम आजीबार्इंचा प्रबंधक कार्यालयात होता. नाश्ता आणि रात्रीचे जेवण करून त्या एक्सप्रेसने आपल्या घराकडे रवाना झाल्या.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने या वृद्ध महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन तिला सर्वतोपरी मदत करून आपल्या नातलगांपर्यंत जाण्याकरता मदत केल्याबद्दल प्रवासी संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांकरता काम करणारे कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे.