ठाण्यात धाडसत्र सुरूच

By admin | Published: June 28, 2017 01:35 AM2017-06-28T01:35:14+5:302017-06-28T01:35:14+5:30

पाच लीटरमागे तब्बल २१० मिली लीटरचे माप कमी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील प्रथमेश पेट्रोलियम

Thane session begins in Thane | ठाण्यात धाडसत्र सुरूच

ठाण्यात धाडसत्र सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पाच लीटरमागे तब्बल २१० मिली लीटरचे माप कमी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील प्रथमेश पेट्रोलियम या पंपासह दोन पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. तसेच नागपूर येथील कारवाईत तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत कारवाई झालेल्या पंपांची संख्या ४७ वर पोहोचली आहे.
पेट्रोल पंपावरुन होणारी ग्राहकांची लूट ठाणे पोलिसांनी राज्यभरातील अनेक पंपाववरील कारवाईतून उघडकीस आणली. रविवारी हे पथक मुख्यमंत्र्यांच्या नागपूर मतदारसंघात धडकले. तिथेही रविवार आणि सोमवारच्या कारवाईत मानकापूर कोरोडी रोडवरील रबज्योत या पेट्रोल पंपावरुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने तिघांना अटक केली. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, ठाणे आणि औरंगाबाद येथेही कारवाईचे हे सत्र मंगळवारीही सुरुच होते.
ठाणे जिल्हयातील टिटवाळा येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ या दरम्यान प्रथमेश पेट्रोलियम या पंपावर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत पाच लीटरमागे सुमारे २१० मिली लीटर पेट्रोल कमी देण्यात येत असल्याचे उघड झाले. ही तफावत उघड होताच याठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली. तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील जीजी पंपावरही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. या कारवाईसह नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यातील कारवाई अपूर्ण असल्यामुळे येथील सविस्तर माहिती देणे शक्य नसल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.

Web Title: Thane session begins in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.