ठाणे: शिवसाई पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, 9 थर लावून मिळवलं 11 लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 03:49 PM2017-08-15T15:49:07+5:302017-08-15T16:30:19+5:30

मनसे ठाणे शहर आयोजित नौपाडा येथील दहीहंडी फोडण्याचा मान बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने पटकावला आहे. यासह त्यांनी 11 लाखांचं बक्षीस देखील मिळवलं.

Thane: Shiv Sai Squad wounded MNS's Dahi Handi, got 9 lakh prizes | ठाणे: शिवसाई पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, 9 थर लावून मिळवलं 11 लाखांचं बक्षीस

ठाणे: शिवसाई पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, 9 थर लावून मिळवलं 11 लाखांचं बक्षीस

Next

ठाणे, दि. 15 - सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव, यंदा जोश-जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज आहेत. मनसे ठाणे शहर आयोजित नौपाडा येथील दहीहंडी फोडण्याचा मान बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने पटकावला आहे. यासह त्यांनी 11 लाखांचं बक्षीस देखील मिळवलं. नौपाड्यातील या दहीहंडीला शिवसाई पथकाने 9 थरांची यशस्वी सलामी दिली, त्यानंतर हंडीची उंची कमी करून त्यांनी हंडी फोडली. जय जवान पथकानं यंदाही 9 थर आणि जमल्यास 10वा थरही लावण्याचा निश्चय केला होता. मात्र ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जय जवान मंडळाचा नऊ थर रचण्याचा पहिला प्रयत्न फसला.


मनसे ठाणे शहर आयोजित या दहिहंडीची ढोल ताशा पथकाने सुरुवात झाली. पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथकला थर लावण्याचा पहिला मान मिळाला मिळाला. आयोजकांकडून हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गिअर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.


यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळणार आहे. मागील काही वर्षांत न्यायालयीन निर्बंधांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या उत्सवावर भीतीचे सावट दिसून आले. मात्र, यंदा गोविंदा पथके सर्व निर्बंध झुगारून ‘करून दाखविणारच’ या निर्धाराने मैदानात उतरताना दिसणार आहेत.
मंगळवारी सकाळी ध्वजारोहणानंतर दहीहंडी उत्सवावाठी गोविंदा पथके कूच करणार आहेत. यानंतर, सकाळपासून काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, ग्रँटरोड, ताडदेव या शहरांतील विभागांमध्ये फिरून, दुपारनंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरात गोविंदा पथके हंड्या फोडण्यासाठी जातील. त्यातही सायंकाळनंतर प्रसिद्ध गोविंदा पथके ठाण्यातील बड्या हंड्या फोडण्यासाठी सहभागी होतील. उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गोविंदा पथके करणार, याकडे पोीिलसांचे बारकाईने लक्ष राहील.
उत्सवादरम्यान सूचनांचे पालन करण्याचे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. तर याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनीही थरांची उंची गाठताना कुटुंबाचा विचार करा, असे आवाहन केले आहे.
पोलिसांचे सुरक्षा कवच : मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात राहतील. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात असून अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून गुप्तचर तपास यंत्रणाकार्यरत असतील, असे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहायुक्त देवेन भारती यांनी सांगितले. ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींचा वॉच असेल.
>आयोजकांची माघार
न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर पडूनही दहीहंडी उत्सवाच्या बड्या आयोजकांनी माघार घेतल्याने यंदाच्या उत्सवात आयोजकांची कमतरता दिसून येणार आहे. त्यामुळे बरेच गोविंदा पथक उपनगरांकडे कूच करताना दिसून येतील. नोटाबंदी आणि वस्तू सेवा करामुळे दहीहंडी आयोजनाचा आलेख ६०-७० टक्क्यांनी खाली उतरला आहे. याशिवाय, ब-याच आयोजकांनी कारवाईच्या धास्तीनेही आयोजनातून काढता पाय घेतलाआहे.
दुसºया बाजूला आयोजनाच्या शर्यतीत असणाºया आयोजकांनी बक्षिसांच्या रकमांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. काही ठिकाणी सहा थरांना ५ हजार रुपयांचे पारितोषिक आहे, तर काही ठिकाणी अवघ्या दीड हजारांचे पारितोषिक आहे. तरीही यंदा गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने काही जणांनी पारंपरिकता जपून तर काहींनी उंची गाठून उत्सव साजरा करणारच असे म्हटले आहे.
>यंदा १० थर : माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांचा विक्रम केला आहे. यंदा याच्याही एक पाऊल पुढे जात दहा थर लागणार आहेत. उपनगराचा राजा मानल्या जाणा-या जय जवान गोविंदा पथकाने या विक्रमासाठी कसून तयारी केली आहे. याशिवाय दादरमधील कलाकारांचा दहीहंडी मुंबईकरांसाठी औत्सुक्याचा विषय आहे.

(फोटो-विशाल हळदे)
 

Web Title: Thane: Shiv Sai Squad wounded MNS's Dahi Handi, got 9 lakh prizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.