परतीच्या पावसाचा ठाणो, नवी मुंबईला तडाखा
By admin | Published: October 2, 2014 02:21 AM2014-10-02T02:21:38+5:302014-10-02T02:21:38+5:30
परतीच्या पावसाने ठाणो, रायगड परिसराला बुधवारी चांगलाच तडाखा दिला. यात घरे, शेती आणि महावितरणचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला.
Next
ठाणो/नवी मुंबई : परतीच्या पावसाने ठाणो, रायगड परिसराला बुधवारी चांगलाच तडाखा दिला. यात घरे, शेती आणि महावितरणचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला.
ठाण्यात जुना बाजार येथील चार दुकानांना आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही ठिकाणी पत्रे उडाले आणि झाडे उन्मळून पडली. ठाणो
शहरात सुमारे 12 मिमी पाऊस पडला. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील जत्रेतील दुकानांचे मोठे नुकसान झाले.
महावितरणच्या पडघा येथील उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वसई, कल्याण, डोंबिवली भागात कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले.
खालापूर तालुक्यात वादळी वारा, गारांसह पाऊस पडला. महावितरणची सेवा 24 तास ठप्प झाली आहे. (प्रतिनिधी)
कोपरखैरणो व ऐरोलीतील काही भागांत बुधवारी सायंकाळी गारा पडल्या. यामुळे फारसे नुकसान झाले नसले तरी गारा वेचण्यासाठी बच्चेकंपनीची धावपळ सुरू होती.