ठाण्यासह महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थांचे स्वतंत्र प्राधिकरण होणार

By Admin | Published: January 18, 2017 03:53 AM2017-01-18T03:53:29+5:302017-01-18T03:53:29+5:30

स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाचा विचार असल्याचे सुतोवाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथील औपचारिक चर्चेत सांगितले

Thane will be the independent authority of housing societies in Maharashtra | ठाण्यासह महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थांचे स्वतंत्र प्राधिकरण होणार

ठाण्यासह महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थांचे स्वतंत्र प्राधिकरण होणार

googlenewsNext


ठाणे : गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाचा विचार असल्याचे सुतोवाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथील औपचारिक चर्चेत सांगितले. ठाणे हौसींग फेडरेशनने बांधलेल्या अत्याधुनिक सभागृहाच्या पाहणीसाठी ते ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
हौसींगसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची गरज असल्याचे निवेदन हौसिंग फेडरेशनने त्यांना दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची गरज असल्याचे मत त्यानी व्यक्त केले.
राज्यात नऊ लाख सहकारी संस्था असून त्यापैकी किमान दहा टक्के म्हणजे ९० हजार या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या गृहनिर्माण संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या नसून सेवा देत आहेत. मात्र, त्यांचा कारभार कसा चालवावा याचे कायद्याचे ज्ञान सर्वांना नसते. हौसींग सोसायटयांचे प्रश्न हे वेगळे प्राधिकरण करून त्यामार्फत सोडविले तर न्यायदेखील लवकर मिळू शकेल, असा विश्वासही देशमुख यांनी चर्चेत व्यक्त केला. गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळे प्राधिकरण सुरू केले तर त्यासाठी येणारा खर्च हा फ्लॅट, गाळा हस्तांतरण फीमधील काही वाटा शासनाला देऊन करता येईल का? याबाबतही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने घेतलेल्या नवीन सभागृहाचे काम पाहून सहकारमंत्र्यानी समाधान व्यक्त केले आणि फेडरेशनचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
>ठाणे फेडरेशनच्या हौसिंग सोसायटी मॅनेजर अभ्यासक्र माचे त्यांनी कौतुक केले. कोर्स सुरू करण्यासाठी, प्रशिक्षण, सेमिनारसाठी वातानुकुलित हॉल व अद्ययावत असे प्रशिक्षण केंद्र हा राज्यातील पहिलाच प्रयत्न केल्याचा गौरव त्यांनी केला.

Web Title: Thane will be the independent authority of housing societies in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.