ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, दिवाळीत होते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:47 AM2017-09-07T03:47:41+5:302017-09-07T03:48:24+5:30

ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (२१, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी आत्महत्या केली.

Thane: Women constable's suicide, marriage was Diwali | ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, दिवाळीत होते लग्न

ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, दिवाळीत होते लग्न

Next

ठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (२१, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या सारिका या २०१४ मध्ये ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्या. प्रशिक्षणानंतर त्यांना ठाणे शहर आयुक्तालयातील मुख्यालयात नेमणूक मिळाली होती. दोन ते तीन सहकारी महिला कॉन्स्टेबलसमवेत कळव्यातील मनीषानगरमध्ये राहत होत्या. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्यामुळे रात्री ९ पर्यंत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनास्थळी चिठ्ठीही मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हा मृतदेह दिला जाणार आहे.
दिवाळीत होते लग्न-
पोलिसांच्या माहितीनुसार सारिका आणि तिचा भावी पती घरातच होते. फोन आल्यामुळे तो बाहेर पडला. त्याच वेळी तिने घरात हा गळफास घेतला. फोन झाल्यानंतर त्याने खिडकीतून आत पाहिले, त्या वेळी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. अशी कोणती चर्चा झाली की, तो बाहेर गेल्यानंतर तिने इकडे आत्महत्या केली. या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचे दिवाळीत लग्न होते.

Web Title: Thane: Women constable's suicide, marriage was Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.