ठाणे : राम मारुती रोडवर तरुणाईने साजरी केली दिवाळी
By Admin | Published: October 29, 2016 01:39 PM2016-10-29T13:39:07+5:302016-10-29T14:11:20+5:30
दिवाळी साजरी करण्यासाठी तरुणाईने राम मारुती रोडवर तुफान गर्दी केली होती. यंदा दिवाळी पहाटचा जल्लोष राम मारुती रोडवर चांगलाच दिसून आला
>
ठाणे, दि. 29 -
*गेल्या 5 वर्षातिल रेकॉर्डब्रेक गर्दी
*झिंगाटवर तरुणाई सैराट
*यंदा दिवाळी पहाटचा तूफान जल्लोष
*रॉक बैंड, डीजे वर तरुणाई थिरकाली
*मोबाइल नेटवर्क जाम झाल्याने तरुणाई हैराण
*यंदा दीवाली पहाटचा जल्लोष
दिवाळी पहाट निमित्त ठाणे येथील राम मारुती रोडवर दर वर्षी पेक्षा यंदा तूफान गर्दी दिसून आली. गेल्या पाच वर्षातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याची चर्चा तरुणाईमध्ये रंगली होती. इंडोवेस्टर्न ही संकल्पना यावेळी पाहायला मिळाली.
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी तलावपाळी, राम मारुती रोड याठिकाणी लावण्यात आलेल्या डीजे, रॉक बैंडवर थिरकुन तरुणांनी दिवाळीचा आनंद लूटला, यामध्ये भर पडली ती ढोलताशा पथकांची. केवळ वेस्टर्न वर नव्हे तर पारंपारिक ढोल ताशा पथकांवरही तरुणाई थिरकली. सध्या झिंगाटचा फीव्हर सर्वत्र असताना दिवाळी पहाटमध्ये ही तो पाहायला मिळाला. डीजेवर लावण्यात आलेल्या झिंगाटवर तरुणाई बेभान होऊन नाचत होती. गर्दीमुळे मात्र सर्वत्र मोबाईल नेटवर्क जाम झाले होते. नेटवर्क प्रॉब्लेममुळे एकमेकांना शोधण्यातच मित्र मैत्रिणींचा काहीसा वेळ गेल्याने याबाबत तरुणाइने तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारी 12 नंतर सर्वानी या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. एकीकडे दिवाळी पहाटनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगले होते तर दुसरीकडे तरुणाईचा जल्लोष होता.
(छायाचित्र - विशाल हळदे)