शौचालयांसाठी ठाणेकरांना मोजावे लागणार पैसे
By admin | Published: March 13, 2016 02:31 AM2016-03-13T02:31:18+5:302016-03-13T02:31:18+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेने नवीन शौचालये उभारण्याचे निश्चित केले आहे. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या शौचालयांची साफसफाई आणि निगा देखभालीसाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत.
वैभव नावडकर : यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम
वर्धा : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
भारताचे सुपूत्र, लोकनेते यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या कर्तृत्वामुळे देश आणि देशाबाहेर प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, गृह, अर्थ, परराष्ट्रीयमंत्री म्हणून त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे. मानवतावादी साहित्यिक, कुटुंंबवत्सल, विचारवंत, वक्ते आणि लोकाभिमुख नेते म्हणून त्यांची कारकीर्द पे्ररणादायी आहे. त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रातून त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडतो, असेही नावडकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी)