ठाण्याचे ‘डराव डराव’ सर्वोत्कृष्ट!
By admin | Published: January 1, 2016 02:21 AM2016-01-01T02:21:21+5:302016-01-01T02:21:21+5:30
ज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या १३ व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव...डराव’ या नाटकाला प्रथम पारितोषिक
ठाणे : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या १३ व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव...डराव’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यभरात पाच विभागांत घेतलेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या नाटकांची स्पर्धा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात २८ ते ३० डिसेंबरदरम्यान झाली. यात सादर झालेल्या १३ नाटकांतून ठाण्याच्या ‘डराव डराव’ने बाजी मारली आहे.
दुसरा क्रमांक मुंबईतील महाराष्ट्र सेवा संघाच्या ‘तुफानातील मोती’ने तर तृतीय क्रमांक सांगलीच्या सस्नेह कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या ‘एका झाडाची गोष्ट’ने पटकावला. नाशिकच्या प्रबोधिनी विद्यामंदिरच्या ‘शहाणपण देगा देवा’ या नाटकाला अपंग गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक राजेश राणे (डराव डराव), द्वितीय पारितोषिक वीणा नाटेकर (तुफानातील मोती), तृतीय उदय गोडबोले (एका झाडाची गोष्ट), अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक रमेश वनीस (शहाणपण देगा देवा) यांना जाहीर झाले आहेत. प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक दीपक नांदगावकर (शेवटचे स्पंदन), द्वितीय सतीश साळुंखे (राखेतून उडाला मोर) तर नेपथ्यासाठी प्रथम विजय फडके (एका झाडाची गोष्ट), द्वितीय अर्चना पवार यांना जाहीर झाले आहे.