शुक्र है, हम लौट आए!

By admin | Published: April 3, 2015 02:30 AM2015-04-03T02:30:32+5:302015-04-03T02:30:32+5:30

खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली.

Thank you, we returned! | शुक्र है, हम लौट आए!

शुक्र है, हम लौट आए!

Next

मुंबई : ‘खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली. एक वेळ अशी होती की, आता मृत्यू अटळ आहे असे वाटत होते. त्यामुळे बिकट परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी डोंगरदऱ्यांचाही आधार घेण्यात आला, असे जहांगीरकडून सांगण्यात येत होते. जहांगीरप्रमाणेच अन्य भारतीयांचीही अवस्था सारखीच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने येमेनमधील १९0 भारतीयांना मुंबईत आणण्यात आले. पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर आल्यानंतर यातील काही जण इतर राज्यातील असल्याने त्यांची मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था करण्यात आली होती.
२२ जानेवारीपासून येमेनमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले असून, त्याने रौद्र रूपच धारण केले आहे. या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले असून, यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. यातीलच १९0 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान एडनमधून निघून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे उतरले. यातील १०० जणांना रेल्वेने इतर राज्यांत पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रत्यक्षात पहाटे विमानतळावर येमेनमधून परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना सीएसटी येथील रेल्वेच्या मुख्यालयात नेण्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद उपस्थित होते. मध्य रेल्वेकडून या परतलेल्या भारतीयांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करतानाच त्यांना रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी उपस्थित येमेनमधून परतलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
एडनमध्ये एका सिमेंट कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला असलेले शक्तीदासन हे मूळचे केरळचे. गेल्याच वर्षी तेथे शक्तीदासन कामाला गेले होते. याविषयी शक्तीदासन यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगतानाच कुटुंबीयांचीही चिंता लागून राहिली होती. मात्र सर्व काही संपले आहे, असे वाटत असतानाच भारतात सुखरूप परतल्याने हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्र्रिया शक्तीदासन यांनी दिली. त्या ठिकाणी योवान मंगेश या एका रुग्णालयात लॅब टॅक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तर मृत्यू कधी कवटाळेल अशीच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाल्याचे सांगितले. भारतात आपण परतणार की नाही असे अनेक विचार येत होते. पण यातून सुखरूपपणे सुटका झाली असून, ते दिवस जरी आठवले तरी अंगावर शहारे येत असल्याचे मंगेश याने सांगितले.

Web Title: Thank you, we returned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.