"मलिक, देशमुख जेलमध्येच राहणार हे मान्य केल्याबद्दल राऊतांचे आभार"; मोहित कंबोज यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:48 PM2022-04-11T22:48:21+5:302022-04-11T22:49:06+5:30
"बाप-बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार," असं ट्वीट राऊत यांनी केलं होतं.
राज्यात अनेकविध घटनांमुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला . यामुळे किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साध तबाप-बेटे तुरुंगात जाणार अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार असं म्हटलं होतं. आता यावरून भाजपच्या मोहित कंबोज यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
"सर्वप्रथम मी हात जोडून संजय राऊत यांचे आभार मानतो. त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्येच राहतील आणि दोघेही दोषी आहेत हे त्यांनी आज दबक्या आवाजात मानलं," असं म्हणत कंबोज यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
संजय राउट का धन्यवाद आज उन्होंने मान लिया मियाँ नवाब और अनिल जेल में ही रहने वाले है ,
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 11, 2022
रहा सवाल अब जेल कौन जाएगा यह कुछ समय में देश को मालूम पड़ जाए गा !
आगे आगे देखो होता हैं क्या ! pic.twitter.com/Qyuli8il5Q
"तर राहीला प्रश्न पिता पुत्र जेलमध्ये जातील का नाही, तर मी जावेद भाईंना हे सांगू इच्छितो की तुम्ही ही गोष्ट आपल्या डोक्यात पक्की करा की पिता पुत्र जेलमध्ये जाणार नाहीत. परंतु येणाऱ्या काळात नबाव मलिक आणि अनिल देशमुख यांच्या शेजारील कोठडीत जावेद तर जाणारच परंतु जावेदसोबत कोण जाईल हे संपूर्ण महाराष्ट्र पाहील," असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते राऊत?
संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये बाप-बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार, असं म्हटलं होतं. तसंच आग लगाने वालों का कहाँ खबर रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे, असेही त्यांनी नमूद केलं होतं.