ठाणे आरटीओे उत्पन्नात सैराट
By admin | Published: May 18, 2016 03:12 AM2016-05-18T03:12:37+5:302016-05-18T03:12:37+5:30
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने २०१५-१६ या वर्षात अपयशाच्या संभाव्य हॅट्रीकला पूर्णविराम देऊन ते पूर्ण करून चक्क भरारी घेतली आहे
पंकज रोडेकर,
ठाणे-महसुली उत्पन्नाचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात सतत दोन वर्षे अपयशी ठरणाऱ्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने २०१५-१६ या वर्षात अपयशाच्या संभाव्य हॅट्रीकला पूर्णविराम देऊन ते पूर्ण करून चक्क भरारी घेतली आहे. दिलेल्या टार्गेटपेक्षा १४.५ टक्के अतिरिक्त उत्पन्नात केली आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत ठाणे आरटीओ विभागाकडून एकूण १ हजार ७४ कोटी ४९ लाखांचा निधी जमा झाला असून १४.५ टक्क्यांप्रमाणे १३२ कोटी ४० लाखांहून अधिक उत्पन्नाची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला २०१५-१६ या वर्षाकरीता प्रादेशिक परिवहन आयुक्तालयाकडून ९४२ कोटींचे टार्गेट दिले होते. मागील दोन वर्षात ठाणे आरटीओला टार्गेटपर्यंतही पोहचता आले नव्हते. मात्र,एप्रिल २०१५ ते मार्च १६ याचदरम्यान, दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकडे आरटीओ विभागाने लक्ष केंद्रीत करून ते पूर्ण केले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांचे अपुरे राहिलेले टार्गेट या अतिरिक्त टार्गेटमध्ये पूर्ण झाल्याचे दिसते.