"ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच"; शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवारांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 09:23 PM2024-07-11T21:23:40+5:302024-07-11T21:24:14+5:30

Sudhir Mungantiwar: १९ जुलैला साताऱ्यात जल्लोषात होणार वाघनखांचे स्वागत

That belongs to Chhatrapati Shivaji Maharaj says Sudhir Mungantiwar over Wagh Nakh Controversy London | "ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच"; शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवारांचे उत्तर

"ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच"; शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवारांचे उत्तर

Sudhir Mungantiwar, Marathi Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून, हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे. लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून ही वाघनखे महाराजांचीच असल्याचा पुनरुच्चार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत समाचार घेतला. तसेच, १९ जुलैला साताऱ्यात जल्लोषात वाघनखांचे स्वागत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत गुरुवारी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी लंडनवरून आणण्यात येणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची असण्याबाबत चर्चा सुरु आहे. यावर सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. यावर सविस्तर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयात असलेल्या वाघ नखाबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत. ते म्हणाले, लंडनवरून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन येत्या १९ जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत असून, तेथे जोरदार स्वागत होणार असून कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रणदेखील त्यांनी आमदारांना व शिवप्रेमींना यावेळी दिले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवले गेल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन मध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे आणून दिली, पाठवली. व्हिकटोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखे दिली जाण्या पूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली, ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून महिती घेतली की जगात कुठे इतरत्र अशी वाघनखे आहेत का? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात किंवा बोलणी केली तेव्हाही या संग्रहालयाने कधीही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नाकारले नाही, अशी माहिती ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर सदर संग्रहालयाने ही वाघनखे आधी एक वर्षाकरता देण्याचा प्रस्ताव दिला, आणि पुन्हा बोलणी केल्यानंतर ही वाघनखे तीन वर्षांकरता देण्याचे त्यांनी मान्य केले, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

१९ जुलैपासून साताऱ्यात वाघनखांचे प्रदर्शन

लंडनवरून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र वाघनखे येत्या १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला पाहता येतील. या सोबतच या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रे प्रदर्शित करणाऱ्या एका शस्त्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. या कार्यक्रमांसाठी सर्व विधिमंडळ सदस्य आणि सर्व शिवप्रेमी सादर निमंत्रित आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: That belongs to Chhatrapati Shivaji Maharaj says Sudhir Mungantiwar over Wagh Nakh Controversy London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.