न्यायालयाने दहशातवाद्याचा शिक्का पुसला तोच माझ्यासाठी मोठा दिलासा - संजय दत्त
By admin | Published: February 25, 2016 03:35 PM2016-02-25T15:35:26+5:302016-02-25T15:45:38+5:30
यालयाने दहशातवाद्याचा शिक्का पुसला तोच माझ्यासाठी मोठा दिलासा आहे असे मत संजय दत्त याने बांद्रा येथिल पत्रकार परिषेदेत मांडले.
Next
ऑनलान लोकमत
मुंबई, दि. २५ - न्यायालयाने दहशातवाद्याचा शिक्का पुसला तोच माझ्यासाठी मोठा दिलासा आहे असे मत संजय दत्त याने बांद्रा येथिल पत्रकार परिषेदेत मांडले. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मी ९३ बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेलो नाही, शस्त्रास्त्र कायद्यानुसार दोषी ठरलो आणि त्याची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडलो आहे. जेलमध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे काम केले, काही दिवस जेल प्रशासन चालवत असलेल्या रेडिओ स्टेशनवर जॉकी म्हणून काम केले. २३ वर्ष ज्या दिवसासाठी मी अक्षरश: मरत होतो तो हा आजचा आझादीचा दिवस आहे. आज मला वडिलांची तीव्रतेने आठवण येत आहे. मला मुक्त झालेलं त्यांना बघायचं होतं अशी भावनिक प्रतिक्रिया संजय दत्तने सुटकेनंतरच्या पत्रकार परिषेदेत दिली
संजय दत्तच्या पत्रकार परिषेदेतील महत्वाचे मुद्दे -
मी देशभक्त आहे, भारतावर माझे प्रेम आहे, म्हणूनच जेलमधून बाहेर आल्यावर ध्वजाला सलाम केला
सलमान खान मला धाकट्या भावासारखा आहे, तो सर्व अडीअडचणींमधून मार्ग काढेल असा विश्वास वाटतो
मान्यता माझी शक्ती असून ती माझी खास मैत्रीणही आहे. मान्यतानं खूप सहन केलं, मी जेलमध्ये होतो त्यावेळी दोन मुलांना संभाळणं, निर्णय घेणं, सारं काही तिनं केले आहे.
जेलमध्ये काम करून कमवलेले पैसे मी एका चांगल्या पतीच्या नात्याने माझ्या पत्नीला दिले
कुटुंबासाठी वेळ देणार आणि अपूर्ण राहिलेल्या चित्रपटांच्या कामाला पुन्हा सुरूवात करणार.
मी गेल्या चार दिवसांपासून काहीही खाल्ले नाही आणि काल रात्रभर झोपलोही नाही
सेलिब्रिटी म्हणून मला जेलमध्ये कधीच विशेष सुविधा मिळाल्या नाहीत
जेलमध्ये अनेक मित्र झाले, त्यांच्याशी भावासारखं नातं निर्माण झाले
घटनाक्रम..
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६ मे २0१३ रोजी संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यापैकी त्याने खटल्यादरम्यान दीड वर्षांची शिक्षा आधीच भोगली होती. त्यामुळे त्याला मे २0१३ पासून साडेतीन वर्षांची शिक्षा पूर्ण करायची होती. ही शिक्षा ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र त्याआधीच संजय दत्तची कारागृहातून सुटका झाली.
सुटकेचे गणित...
कैद्याच्या वर्तवणुकीनुसार महिन्याला सात दिवस शिक्षा कमी होऊ शकते. अशी वर्षाला ८४ दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. कैद्याचे वर्तन उत्तम असेल तर अतिरिक्त ३0 दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. या हिशेबानुसार संजय दत्तची वर्षातील ११४ दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. जेल अधीक्षकांना कोणत्याही कैद्याची ३0 दिवसांची, पोलीस उपमहानिरीक्षकांना ६0 दिवसांची, तर पोलीस महासंचालकांना ९0 दिवसांची सुटी माफ करण्याचे अधिकार आहेत. संजयला बेकायदेशीरपणे शिक्षेत माफी देण्यात आली आहे.त्याने असे कोणते चांगले वर्तन केले आहे की त्याला आठ महिन्यांची शिक्षा माफ करण्यात आली?असा प्रश्न विचारला आहे.