Dhananjay Munde : "बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई केली जावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:32 PM2023-02-15T12:32:04+5:302023-02-15T12:41:08+5:30

Dhananjay Munde : सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण बोलणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

The accused in bogus recruitment case should be thoroughly investigated, strict action should be taken against culprits says Dhananjay Munde | Dhananjay Munde : "बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई केली जावी"

Dhananjay Munde : "बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई केली जावी"

googlenewsNext

मुंबई - धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावे समोर आली असून, यांपैकी कोणत्याही व्यक्तीचा आपल्याशी किंवा तत्कालीन मंत्री कार्यलयाशी कसलाही संबंध नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात शिपाई असल्याचे भासवत या तरुणांनी एका जनास नोकरी लावून देतो, असे सांगत फसवणूक केली असून, या बोगस नोकर भरती प्रकरणी देण्यात आलेले पत्र देखील बनावट आहे, त्यावर असलेले सह्या आणि शिक्के देखील बनावट असून, नोकरी शोधत असलेल्या लोकांनी अशा भामट्यांपासून सावध राहायला हवे.

या प्रकरणी मुंबईतील गोवंडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण बोलणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: The accused in bogus recruitment case should be thoroughly investigated, strict action should be taken against culprits says Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.