फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:10 AM2023-09-19T06:10:41+5:302023-09-19T07:15:12+5:30

टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे.  

The amount deducted from FASTag will be refunded; The decision followed the anger of the servants | फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय

फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय

googlenewsNext

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी दिली. असे असताना टोलनाक्यावरून जाणाऱ्या चाकरमान्यांच्या फास्टॅगमधून टोलवसुली केली गेली. यामुळे चाकरमानी संतापले. त्यांच्या रोषानंतर परिवहन विभाग फास्टॅगमधून कापलेले  पैसे संबंधितांना परत करणार आहे. 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय घेऊनही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेल्याने काहींनी परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे.  याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतल्यास वाहन चालकांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. 

Web Title: The amount deducted from FASTag will be refunded; The decision followed the anger of the servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.