बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित, ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी; CM शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 01:35 PM2024-08-21T13:35:21+5:302024-08-21T13:35:56+5:30

"राजकारण करायला तर खूप जागा आहेत. खूप मुद्दे आहेत. तेथे राजकारण करायला हवे. या छोट्या बच्चूसोबत घडलेल्या घटनेचे राजकारण करता, खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी,"

The Badlapur agitation was motivated by politics, those who did it should be ashamed; CM eknath Shinde's serious accusation against the opposition | बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित, ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी; CM शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप

बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित, ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी; CM शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप

बदलापूरमधील आदर्श विद्यालय शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवरील कर्मचाऱ्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेनंतर, नागरिकांनी मंगळवारी जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी सुरुवातीला शाळेसमोर आंदोलन केले. यानंतर आंदोलक थेट बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचले आणि त्यांनी 'रेल रोको' केला. जवळपास 8-9 तास चाललेल्या या आंदोलनामुळे सायंकाळी साधारणपणे 6 वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. यामुळे प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. यासंदर्भात बोलताना, "कालचे आंदोलन हे राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. या छोट्या बच्चूसोबत घडलेल्या घटनेचे राजकारण करता, खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी. विरोधकांना माझे केवळ एवढेच सांगणे आहे की, 'मुख्यमत्री माझी लाडकी बहीण' योजनेमुळे जो काही पोटशूळ उठला आहे, तो कालच्या आंदोलनातून दिसला," असे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, "दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना काल त्रास झाला. 8-9 तास रेल्वे बंद होती, असे व्हायला नको होते. हीदेखील दुर्देवी घटना आहे. लाखो प्रवासी त्या रल्वेत होते. त्यातही मुलं होती, त्यातही महिला होत्या, त्यातही ज्येष्ठ नागरिक होते. परंतु कालचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर... जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती."

लोकसभेतील धक्क्यानंतर, ३ पक्ष आणि महायुती सरकारने उचललेल्या पावलांमुळे वातावरण फिरतंय किंवा फिरेल, असं वाटतं का?

हो, महायुतीला फायदा होऊ शकतो (345 votes)
नाही, वातावरण फिरताना दिसत नाही (505 votes)

Total Votes: 850

VOTEBack to voteView Results

...त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी -
"खरे तर 8-9 तास रेल्वे रोखणे हे देशाचे नुकसान आहे. रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान आहे. त्यामुळे एका छोट्या बच्चूचे राजकारण करून... राजकारण करायला तर खूप जागा आहेत. खूप मुद्दे आहेत. तेथे राजकारण करायला हवे. या छोट्या बच्चूसोबत घडलेल्या घटनेचे राजकारण करता, खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी," असेही शिंदे म्हणाले. 

शिंदे म्हणाले, "मी हेही सांगतो की गाड्या भरून-भरून येऊन तेथे आंदोलन करते हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. तुमच्या मीडियामध्ये आहे. जे आले होते, ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. अशी आंदोलन असतात का की, ताबडतोब बोर्ड छापून आणतात. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण, 'लाडक्या बहिणीचे पैसे नको,  मुलगी सुरक्षित पाहिजे', 'लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे'. या राज्यातील बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारची आहे आणि यात, जेजे काही करता येईल कठोर, ते सरकार करेल. कुणालाही सोडणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही. यात कुणीही आलं तरीसुद्धा यात जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल."

"विरोधकांना केवळ माझे एवढेचसांगणे आहे की, मुख्यमत्री माझी लाडकी बहीण योजना, ही जी काही त्यांच्या जिव्हारी लागली आहे, जी पोटदुखी वाढली आहे. जो काही पोटशूळ उठला आहे, तो कालच्या आंदोलनातून दिसला," असा टोलाही यावेळी मुख्यंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगाला.
 

Web Title: The Badlapur agitation was motivated by politics, those who did it should be ashamed; CM eknath Shinde's serious accusation against the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.