Union Budget 2024 : राज्यातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी अर्थसंकल्पाने लक्षात आणून दिली - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 04:03 PM2024-07-23T16:03:13+5:302024-07-23T16:05:47+5:30
Union Budget 2024 : या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य करत राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. मात्र, या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
यासंदर्भात रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला. कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत… pic.twitter.com/9A5GFe3ESS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 23, 2024
याचबरोबर, हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल, तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या वाटाघाटी आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, असेही रोहित पवार यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.