आधीच खडाजंगी! विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, ९ मार्चला अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:26 AM2023-02-27T06:26:52+5:302023-02-27T06:27:21+5:30

राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंचत चालणार आहे.

The budget session of the Legislature will be started from today, budget present will be on March 9 | आधीच खडाजंगी! विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, ९ मार्चला अर्थसंकल्प

आधीच खडाजंगी! विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, ९ मार्चला अर्थसंकल्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये पूर्वसंध्येलाच जाेरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंचत चालणार आहे. ८ मार्च रोजी अर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. बजेटवर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. अधिवेशनात एकूण १३ विधेयके मांडली जाणार असून विधान परिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. नव्याने ७ विधेयके सादर केली जाणार आहेत. विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत नाही, त्यामुळे ३ विधेयके वरच्या सभागृहात रखडली आहेत. 

Web Title: The budget session of the Legislature will be started from today, budget present will be on March 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.