कोंबडीने दिला चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:33 PM2022-11-20T13:33:09+5:302022-11-20T13:33:40+5:30
सर्वसाधारणपणे कोंबडी दोन पायाच्या पिल्लांना जन्म देत असते . परंतु चार पायाच्या पिल्याला जन्म देण्याची दुर्मिळ घटना बोरीवडे ( ता . पन्हाळा ) येथे घडली आहे.
अनिल पाटील
सरुड :
सर्वसाधारणपणे कोंबडी दोन पायाच्या पिल्लांना जन्म देत असते . परंतु चार पायाच्या पिल्याला जन्म देण्याची दुर्मिळ घटना बोरीवडे ( ता . पन्हाळा ) येथे घडली आहे. येथील एका कोंबडीने चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म दिला आहे . चार पायाचे हे पिल्लू पाहुन कोंबडीच्या मालकांसह ग्रामस्थांच्यातुन आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहीती अशी बोरीवडे येथील सखाराम हिंदूराव शिंदे यांच्या मालकीच्या कोंबडीने शनिवारी एकुण १२ पिल्लांना जन्म दिला. या बारा पिल्लांपैकी ११ पिल्लांना दोन पाय आहेत. तर एका पिल्लाला चार पाय आहेत. हे पिल्लू पाहताच शिंदे कुटुबिंयाना प्रथमता आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे हे पिल्लू जिवंत आहे. या पिल्याला इतर पिल्ल्याप्रमाणे असणारे दोन पाय तसेच या पायाच्या मागील बाजुस दोन असे एकुण चार पाय आहेत . ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे पशुवैधकीयांच्यातुन सांगण्यात येते . दरम्यान हे चार पायाचे पिल्लू बोरीवडे परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.