देशवासी खाणार ३० हजार कोटींचे आईस्क्रीम, पुरण, पाणीपुरी, जलजिरा असे २०० प्रकारचे फ्लेव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:01 IST2025-04-04T10:01:00+5:302025-04-04T10:01:18+5:30
Ice Cream: आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

देशवासी खाणार ३० हजार कोटींचे आईस्क्रीम, पुरण, पाणीपुरी, जलजिरा असे २०० प्रकारचे फ्लेव्हर
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर - आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. त्यातील २० हजार कोटींची आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात विक्री होईल, असा दावा आईस्क्रीम उद्योगाने केला आहे.
गुजरातनंतर महाराष्ट्रात आईस्क्रीमची मोठी विक्री
देशात सर्वाधिक आईस्क्रीम गुजरात राज्यात विक्री होते, तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. तिसऱ्या स्थानावर कर्नाटक, तामिळनाडू व चौथ्या स्थानावर दिल्लीचा नंबर लागतो.
कोणकोणते फ्लेव्हर?
- आईस्क्रीम उद्योगात आरएनडी विभाग सतत नवनवीन फ्लेव्हर तयार करीत असतो. आजघडीला २०० पेक्षा अधिक फ्लेव्हरचे आईस्क्रीम बाजारात आहेत.
- फळांच्या स्वाद, फुलांचा स्वाद एवढेच नव्हे तर आता तीळ-गुळाचे आईस्क्रीम, पाणीपुरीच्या स्वादाचे आईस्क्रीम, तसेच पुरणाच्या स्वादाचेही आईस्क्रीम बनविण्यात आले आहेत.
-कोकनट, जलजीरा, आईस्क्रीम असेही प्रकार आहेत. जेवण झाल्यानंतर जे लोक आईस्क्रीम खातात, त्यांच्यासाठी बनारसी पानाचा फ्लेव्हरही आहे.
न्यूझिलंडमध्ये प्रतिव्यक्ती २२ लिटर आईस्क्रीमचा खप आहे. भारतात प्रतिव्यक्ती ७०० मि.लि. खप आहे. आईस्क्रीम उद्योगाला आपल्या देशात वाढीसाठी पोषक वातावरण आहे. अत्याधुनिक मशिनरीत आईस्क्रीम बनविले जाते. २०३० पर्यंत ५० हजार कोटींचे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
अनिल पाटोदी, अध्यक्ष स्मॉल स्केल आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन