आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल मे महिन्याच्या प्रारंभी येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:42 PM2023-04-20T12:42:34+5:302023-04-20T12:43:03+5:30

Maharashtra Politics: शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरविल्यास महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला मोठा हादरा बसेल. कारण अपात्रतेची नोटीस बजावली, त्यात शिंदे यांचाही समावेश आहे

The decision of the Supreme Court regarding MLA disqualification will come in the beginning of May? | आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल मे महिन्याच्या प्रारंभी येणार ?

आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल मे महिन्याच्या प्रारंभी येणार ?

googlenewsNext

- हरिश गुप्ता 

नवी दिल्ली - शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक गट फुटून बाहेर पडला. हे कृत्य राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार पक्षांतर ठरते का किंवा आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला असतानाही ते आमदारांना अपात्र ठरवू शकतात का, याबद्दल सर्वोच्च न्यायालय मे महिन्याच्या प्रारंभी निर्णय देण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत दोन राजकीय स्फोट होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्तविली आहे. मविआतील संकट दूर झाल्याचे संकेत यातून मिळत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरविल्यास महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला मोठा हादरा बसेल. कारण अपात्रतेची नोटीस बजावली, त्यात शिंदे यांचाही समावेश आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरविले तरीही राज्यातील सरकारल कोणताही धोका नाही, असा भाजपल विश्वास आहे...

अशी आहे शिंदे सरकारच्या समर्थक आमदारांची फळी
महाराष्ट्रात भाजप व शिंदे समर्थ आमदारांच्या आघाडीतून साकारलेल्य सरकारला १६२ आमदारांचा पाठिंब आहे. त्यात भाजपचे १०५, शिंदे गटा ४०, लहान पक्षांचे ५ व १२ अपक्ष आमदार आहेत. बहुमतासाठी १३ आमदारांची आवश्यकता आहे. १ आमदार अपात्र ठरले तरी या आघाड सरकारच्या हाती १४६ आमदार उरतात त्यामुळे या सरकारला कोणताही धोक नाही, असे भाजपचे मत आहे.

पाठिंब्यासाठी प्रयत्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयाने अपात्र ठरविल्यास नव्या सरकारची रूपरेषा काय असेल याबद्दल अनेक शक्यतांचा विचार केला जात आहे. अन्य पक्षांमधील आणखी काही आमदारांचा सरकारसाठी पाठिंबा घेण्यास भाजप राजी आहे, असे त्या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: The decision of the Supreme Court regarding MLA disqualification will come in the beginning of May?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.