निवडणूक आयोग खिशात घालून फिरताहेत; प्रियांका गांधींना नोटीस पाठविल्यावरून वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:11 AM2023-11-16T11:11:37+5:302023-11-16T11:11:57+5:30

हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत. अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू, असा इशाराही त्यांनी दिला.

The Election Commission is walking around with BJP pockets; Vadettivar criticized for sending notice to Priyanka Gandhi | निवडणूक आयोग खिशात घालून फिरताहेत; प्रियांका गांधींना नोटीस पाठविल्यावरून वडेट्टीवारांची टीका

निवडणूक आयोग खिशात घालून फिरताहेत; प्रियांका गांधींना नोटीस पाठविल्यावरून वडेट्टीवारांची टीका

प्रियांका गांधींना नोटीस पाठविल्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपावाले निवडणूक आयोग खिशात घालून फिरतात. खरेतर निवडणूक आयोग हा भाजपाचा झाला आहे. राम मंदिराचे दर्शन मोफत दाखवू म्हणत मत मागणाऱ्यांना नोटीस का नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 

धार्मिक भावनांना हात घालून मत मागणे हे कुठल्या संविधानात, आचारसंहितेत आहे. कारवाई करायची असेल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांना नोटीस द्यायला पाहिजे, हे सगळा घाबरल्याचा परिणाम आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

अधिवेशनापूर्वी जर सरकारला लाज-लज्जा असेल तर त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करावी. शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देणार होते, ते अद्याप मिळालेले नाहीत. आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिल्यावर दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवली गेली, मदतीची घोषणा केली आहे, मात्र मदत मिळालेली नाही, अश टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली. 

हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत. अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू, असा इशाराही त्यांनी दिला. धान पीक निघायला सुरवात झाली असल्याने सातशे रुपये बोनस मागणी करत आहे. सरकारकडून अद्याप पूर्तता झाली नाही. सरकारने लवकरात लवकर बोनस द्यावे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यानंतर घोषणा सरकार करणार आहे का? असा सवाल करत राजू शेट्टींची तीच मागणी आहे. आजच्या चर्चेनंतर आम्ही त्या संदर्भात बोलू, असेही ते म्हणाले. 

कुठल्या जागा कोणासाठी मेरिटवर या संदर्भातील चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत संदर्भात निकाल आल्यानंतर जागावाटप संदर्भातही चर्चा होईल. देशाचे राजकारण करणारे विष पसरवणारे या देशातून हाकलले पाहिजेत. सत्ता उलथून लावण्यासाठी एक मुखी निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 
 

Web Title: The Election Commission is walking around with BJP pockets; Vadettivar criticized for sending notice to Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.