४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारा देशातील पहिला वकील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:35 AM2022-07-04T09:35:40+5:302022-07-04T09:36:06+5:30

कोरपन्याचा दीपक चटप ठरला ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’

The first lawyer in the country to get a scholarship of Rs 45 lakh | ४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारा देशातील पहिला वकील

४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारा देशातील पहिला वकील

googlenewsNext

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप हा ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ ठरला असून ‘चेव्हनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाखांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी झाला आहे. अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळविणारा तो देशातील पहिला तरुण वकील आहे. 

सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी  ॲड. दीपक चटप याची निवड झाली.  ॲड. चटप हा ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून, या दुर्बल घटकांच्या  प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे. शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप, पद्मश्री डॉ. अभय बंग, ॲड. असीम सरोदे व  माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले. 

...अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
 ॲड. दीपक चटप यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथे केले, तर पुण्यातून ते एलएलबी झाले. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात  अनेक तक्रारी दिल्या. ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह आणि ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ ही दोन पुस्तके लिहिली. कोरो इंडिया फेलोशिपद्वारे संविधानिक हक्कांवर ते काम करीत आहेत.

लखमापूर ते लंडन हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, कुटुंब व मित्रांनी खंबीर साथ दिल्याने ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकलो. लंडनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांच्या न्याय्यहक्कांसाठी कार्य करणार आहे. -ॲड. दीपक चटप, लखमापूर, जि. चंद्रपूर

Web Title: The first lawyer in the country to get a scholarship of Rs 45 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.