गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंगलप्रभात लोढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 09:54 AM2023-04-07T09:54:58+5:302023-04-07T09:55:30+5:30

शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

The funds for the conservation of the forts will not be allowed to fall says Minister Mangal Prabhat Lodha | गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंगलप्रभात लोढा

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- मंगलप्रभात लोढा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, महाड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४३ व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी अभिवादन केले. किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी त्यांनी किल्ले रायगडासह इतर गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन केले. राज्यातील गडकिल्ले संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील  आहे. रायगड किल्ल्याच्या परिसरात होत असलेल्या शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांना शासन निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अफजलखान वधाची प्रतिकृती प्रतापगडावर उभी केली जाणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर बुधवार व गुरुवार असे दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिवसमाधी आणि जगदिश्वर मंदिर दीपवंदना, पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), शाहीर किरणसिंग सुरज राऊळ (जळगाव) यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ तसेच श्री जगदिश्वर मंदिरात ‘हरिजागर’ असे कार्यक्रम झाले. 
  • गुरुवारी श्री जगदिश्वर पूजा,  श्री हनुमान जन्मोत्सव आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, राजदरबार येथे श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आ. भरतशेठ गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, आ. धैर्यशील पाटील, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आदी उपस्थित होते. 
  • सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे शूर सरदार हरजी राजे महाडिक यांचा शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. मराठ्यांच्या समाधीस्थळांचे अभ्यासक प्रवीण भोसले यांना यावर्षीचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार प्रदान केला. 
  • शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशनही करण्यात आले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात, त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Web Title: The funds for the conservation of the forts will not be allowed to fall says Minister Mangal Prabhat Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.