उद्या या देशाच्या भविष्याचा निर्णय; ...म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा, संजय राऊत स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:29 PM2023-05-10T17:29:54+5:302023-05-10T17:30:19+5:30

"आपली न्यायालये अथवा आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, की कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? याचाही निर्णय उद्याच लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे."

The future of this country will be decided tomorrow; ...So Supreme Court verdict is important, Sanjay Raut spoke clearly | उद्या या देशाच्या भविष्याचा निर्णय; ...म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा, संजय राऊत स्पष्टच बोलले 

उद्या या देशाच्या भविष्याचा निर्णय; ...म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा, संजय राऊत स्पष्टच बोलले 

googlenewsNext

 
राज्यातील शिवसेना सत्ता संघर्षावर उद्या (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्शवभूमीवर शिवसेना (उबाठा गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "या देशाच्या भविष्याचा निर्णय उद्या होईल. पाकिस्तानातील संविधान आज आपल्याला जळताना दिसत आहे, पाकिस्तान हे आपले शत्रू राष्ट्र जळत आहे. कारण ते संविधानानुसार, कायद्यानुसार चाललेले नाही." असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

राऊत म्हणाले, "आमदार अपात्र ठरतील, सरकार पडेल, सरकार येईल, सरकार जाईल, राजकारणात या गोष्टी सुरूच राहतात. मात्र, या देशाच्या भविष्याचा निर्णय उद्या होईल. पाकिस्तानातील संविधान आज आपल्याला जळताना दिसत आहे, पाकिस्तान हे आपले शत्रू राष्ट्र जळत आहे. कारण ते संविधानानुसार, कायद्यानुसार चाललेले नाही. विरोधकांवर सूड बवद्धीने कारवाया सुरू आहेत. सरकारे पाडली जात आहेत. सरकारे आणली जात आहेत. न्यायव्यवस्ता विकली गेली आहे. हे चित्र या देशात असू नये. यासाठी उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे."

म्हणून आम्ही आशावादी -
या देशाचे स्वातंत्र, ज्या हजारो क्रांतीविरांनी, स्वातंत्र सैनिकांनी बलिदान देऊन आम्हाला दिले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानही आहे. यामुळे त्याच्या रक्षाणासंदर्भातील निकाल उद्या येईल, म्हणून आम्ही आशावादी आहोत, असे राऊत म्हणाले. याच बरोबर, या देशात लोकशाही आहे की नाही? देशातील विधानसभा आणि संसद हे संविधानानुसार काम करत आहेत की नाही? आपली न्यायालये अथवा आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, की कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? याचाही निर्णय उद्याच लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

निकाल आमच्याच बाजूने येणार, शिवसेनेच्या दोन्ही गटांना विश्वास -
महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षावर राज्यातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेने शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही गटांकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. यावर आता उद्या सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे.

Web Title: The future of this country will be decided tomorrow; ...So Supreme Court verdict is important, Sanjay Raut spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.