घरात बसून सरकार चालत नसते, बबनराव पाचपुतेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:39 PM2022-06-21T15:39:09+5:302022-06-21T15:40:24+5:30

Babanrao Pachpute : श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी शिवेसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

The government does not work sitting at home, Babanrao Pachpute's criticizes Uddhav Thackeray | घरात बसून सरकार चालत नसते, बबनराव पाचपुतेंचा उद्धव ठाकरेंना टोला

घरात बसून सरकार चालत नसते, बबनराव पाचपुतेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Next

अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत सोमवारी भाजपाने दिलेल्या जबर धक्क्यातून महाविकास आघाडी सरकार सावरण्यापूर्वीच शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिवसेनेचे काही आमदार घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने गटनेते पदावरून दूर केले आहे. त्यांच्या जागी आशिष चौधरी यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. यातच श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी शिवेसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बबनराव पाचपुते म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरघर कालच्या विधानपरिषद निवडणूक निकालात लागली होती. घरात बसून सरकार चालत नसते. आता शिवसेनेत फूट पडल्याचे समोर आल्यावर भाजपचे सरकार पुन्हा येणार हे निश्चित आहे. या घडामोडींवर आमचे नेते देवेंद्र फडणवीस हाताळत असून ते काय करतात, हे पाहणासाठी वाट पाहावी लागेल" असे सूचक वक्तव्यही बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

याचबरोबर, बबनराव पाचपुते पुढे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे काय करतात याचा अनुभव आघाडी सरकारने याआधी घेतला असून आठवड्यात दोन वेळा त्यांनी आघाडीला दिलेले धक्के असह्य झाले आहेत. आता शिवसेना फुटल्याचे समजते. मुळात मुख्यमंत्री घरात बसून सरकार चालवित होते. त्याचा फायदा त्यांच्या सहकारी पक्षांनी अलगद घेतला. त्यामुळे शिवसेनेची बंडाळी झाल्याचे दिसते. आता राज्याला भाजप शिवाय स्थिर व मजबूत सरकार कोणी देऊ शकत नसल्याचे वास्तव आहे. लवकरच ते होईल," असा विश्वासही बबनराव पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, काल विधान परिषद निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेले अनेक आमदार नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची झोप उडाली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच,एकनाथ शिंदे यांच्याकडे २० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांना किमान ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. 

एकनाथ शिंदेंनी केलेलं ट्विट
''आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही'', असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं आहे. 

Web Title: The government does not work sitting at home, Babanrao Pachpute's criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.