हिवाळी अधिवेशनात 'या' ५ प्रश्नांवरून सरकारला घेरणार; अंबादास दानवेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:43 PM2023-12-06T17:43:15+5:302023-12-06T17:43:52+5:30

मंत्र्यांची भिन्न विधाने असून मुख्यमंत्री खुर्ची वाचविण्यात व्यस्त असल्याचीही केली टीका

The government will be surrounded by 'these' 5 questions in the winter session; Warning of Ambadas Demons | हिवाळी अधिवेशनात 'या' ५ प्रश्नांवरून सरकारला घेरणार; अंबादास दानवेंचा इशारा

हिवाळी अधिवेशनात 'या' ५ प्रश्नांवरून सरकारला घेरणार; अंबादास दानवेंचा इशारा

Ambadas Danve, Winter Session Maharashtra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला विविध प्रश्नी धारेवर धरणार असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला ५ महत्त्वाच्या प्रश्नांवरून घेरण्याबाबत माहिती दिली.

"राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया व बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या ५ प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही सरकारला घेरणार आहोत. आज राज्यात दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. शेतकऱ्यांची विविध समस्यांमुळे झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील असलेल्या सरकार सोबत चहापाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांप्रति देशद्रोह ठरेल, म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या आदल्यादिवशी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सरकारने आयोजित केलेल्या चहापाणी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याची भूमिका घेतली," असे दानवे म्हणाले.

"सरकारने ४० तालुक्यात केलेली दुष्काळ मदत ही राजकिय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप दानवे यांनी केला. राज्यातील सर्व तालुक्यात दुष्काळाची मदत जाहीर झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी दानवे यांनी केली आहे. नागपूर, संभाजीनगर, ठाणे, कळवा व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांअभावी दुदैवी मृत्यूच्या घटना घडल्या. आरोग्य विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे. राज्यात मोठया प्रमाणात उघडकीस आलेले ड्रग्सचे प्रकरण पाहता ड्रग्स निर्मितीचे कारखाने अधिकृतपणे सुरू आहे की काय अशी शंका दानवे यांनी व्यक्त केली. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचार सरकारी खर्चाने करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला. विदर्भ मराठवाडयात मोठया प्रमाणात शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सभागृहात आवाज उठविणार," अशी माहिती दानवेंनी दिली.

मंत्र्यांची भिन्न विधाने, मुख्यमंत्री खुर्ची वाचविण्यात व्यस्त

सरकारमधील मंत्री यांच्यात ताळमेळ नसून ते सतत वेगवेगळी विधाने करतात, मुख्यमंत्री यांच त्यांच्यावर नियंत्रण नसून ते खुर्ची वाचविण्यात व्यस्त असल्याची टीका दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Web Title: The government will be surrounded by 'these' 5 questions in the winter session; Warning of Ambadas Demons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.