वैद्यकीय प्राध्यापकांच्या वयाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दारी, सेवानिवृत्ती परिपत्रक मागे घेण्याची मागणी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:28 AM2023-03-22T06:28:12+5:302023-03-22T06:37:30+5:30

भूलतज्ज्ञ विभागातही भरती झालेली नाही. पालिका रुग्णालयांच्या बाजूला मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आहेत,  अनेकदा शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात पाठवले जाते.

The issue of the age of medical professors is now at the door of the Chief Minister, the demand to withdraw the retirement circular remains | वैद्यकीय प्राध्यापकांच्या वयाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दारी, सेवानिवृत्ती परिपत्रक मागे घेण्याची मागणी कायम

वैद्यकीय प्राध्यापकांच्या वयाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दारी, सेवानिवृत्ती परिपत्रक मागे घेण्याची मागणी कायम

googlenewsNext

मुंबई : सेवानिवृत्तीबाबत काढलेले परिपत्रक मागे घेऊन त्याचे वय ६२ करावे, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील प्राध्यापक आणि डॉक्टरांनी एकत्र येत आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे ६० हून अधिक डॉक्टर - प्राध्यापकांनी सहभाग घेतला.  मात्र, पालिका  कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसल्यानंतर प्राध्यापक - डॉक्टरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तसेच पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांचीही भेट घेतली.

भूलतज्ज्ञ विभागातही भरती झालेली नाही. पालिका रुग्णालयांच्या बाजूला मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आहेत,  अनेकदा शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात पाठवले जाते.  रुग्णालयाची दयनीय अवस्था होण्यामध्ये अधिष्ठाता व संचालक जबाबदार असल्याचेही दावे होत आहेत.   केईएममध्ये गेली १२ वर्षे जिवंत दात्यांचे प्रत्यारोपण बंद आहे.  येथे प्रत्यारोपण सुरू व्हावे, यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही असा आरोप केला जात आहे. या प्रमुख रुग्णालयांचे नेतृत्व दंत शाखेच्या पदवीधर करत आहेत. जगात कुठेही अशा प्रकारचा नियम नाही, अशी माहिती डॉ. रविंद्र देवकर यांनी दिली.

चार प्रमुख मागण्या
डॉक्टरांसह प्राध्यापकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत. त्यात २८ फेब्रुवारी रोजीच्या  परिपत्रकानुसार प्राध्यापक, डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ करावे. अधिष्ठाता, संचालक आणि विभागप्रमुखांच्या जागा भराव्यात. तसेच, 
रिक्त सर्व पदे लवकर भरावीत आदी 
मागण्या असल्याचे शिक्षक संघटनेने सांगितले.

इच्छुक शिक्षक पदोन्नतीपासून दूर जाण्याची भीती
अनेक शिक्षकांनी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत. यामुळे, सहायक पदावर कार्यरत असलेले अनेक तरुण, मेहनती, उत्साही आणि सर्वोत्तम सेवा देण्यास इच्छुक असलेले प्राध्यापक हे पदोन्नत्तीपासून दूर फेकले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, काही विशिष्ट डॉक्टरांसाठी वेळोवेळी प्राध्यापक डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले असल्याचा आरोप डॉक्टर करत आहेत. यापूर्वी डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० नंतर ६२ करण्यात आले.

... तरीही प्राध्यापकांची भरती नाही
सातपेक्षा अधिक वर्षे उलटूनही सहायक प्राध्यापकाची भरती केली नाही. अनेक पालिका रुग्णालयांची अवस्था अवस्था मोडकळीस आली आहे.  पालिका प्रशासनासह राज्य शासनाकडून काही हालचाल न झाल्यास लवकरच पुढील भूमिका जाहीर करू.
- डॉ रवींद्र देवकर, शिक्षक संघटनेचे सचिव, 
केईएम रुग्णालय १२ वर्षे प्रत्यारोपण बंद 

Web Title: The issue of the age of medical professors is now at the door of the Chief Minister, the demand to withdraw the retirement circular remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.