आईची वाट पाहत अखेर बछड्याने सोडला प्राण; वनविभागासह गावकरी हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:47 AM2022-12-05T05:47:52+5:302022-12-05T05:48:22+5:30

३० नोव्हेंबरला शिदवाडी शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या उसाच्या फडात नुकताच जन्मलेला बिबट्याचा बछडा आढळला होता.

The leopard calf finally died while waiting for its mother; The villagers along with the forest department were sad | आईची वाट पाहत अखेर बछड्याने सोडला प्राण; वनविभागासह गावकरी हळहळले

आईची वाट पाहत अखेर बछड्याने सोडला प्राण; वनविभागासह गावकरी हळहळले

googlenewsNext

चाळीसगाव ( जि. जळगाव ) : जन्मत:च उसाच्या फडात सोडून गेलेल्या आईच्या भेटीसाठी आसुललेल्या पाच दिवसाच्या बछड्याचा रविवारी मृत्यू झाला.  

३० नोव्हेंबरला शिदवाडी शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या उसाच्या फडात नुकताच जन्मलेला बिबट्याचा बछडा आढळला होता. वनविभागाने सतत तीन दिवस बछड्याला शेतात ठेवले. कॅमेरेही लावले गेले. तथापि, बछडा आणि त्याची आई यांची भेट होऊ शकली नाही. चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व त्यांच्या टीमने बछडा व त्याच्या आईची पुनर्भेट व्हावी, यासाठी प्रयत्न केले पण यश आले नाही. बछड्याची आई चार दिवसांपासून परिसरात फिरकली नाही. लॅक्टो शुगर दुधात मिसळून या बछड्याला दिली जात होती.  मात्र, त्याचा उपयोग  झाला नाही.

Web Title: The leopard calf finally died while waiting for its mother; The villagers along with the forest department were sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.