रेंगाळलेला मान्सून हलणार, पण कासवगतीने; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:35 AM2023-06-19T05:35:48+5:302023-06-19T06:30:31+5:30
तळकोकणातील काही ठिकाणी २२ जूनपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई : बिपोरजॉय चक्रीवादळामुळे तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेंगाळलेल्या मान्सूनचा मुक्काम हलण्याची शक्यता असून, २२ जूनपर्यंत मान्सून पुढे सरकण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तळकोकणातील काही ठिकाणी २२ जूनपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना चार दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
२३ जून ते ६ जुलै या पंधरवड्यात कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पेरणीयोग्य, तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात साधारण मोसमी पावसाची शक्यता आहे. ७ जुलैनंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा.
- माणिकराव खुळे,
निवृत्त हवामान अधिकारी