"महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:15 IST2025-04-15T13:14:37+5:302025-04-15T13:15:04+5:30

Harshwardhan Sapkal Criticize Mahayuti Government: "कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी" अशी मराठीत एक म्हण आहे. पण महायुती सरकारने "निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण" अशी नवी म्हण रुढ केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ य़ांनी केली आहे.

"The Mahayuti government has adopted a new saying, 'Farmers for elections and beloved sisters for votes'", says Congress State President Harshwardhan Sapkal | "महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका 

"महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका 

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. या योजनेच्या जोरावर महायुतीने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी  महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महिना २१०० रुपये देण्याचं तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुती सरकारने हात आखडता घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती  सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

या संदर्भात केलेल्या एक्सवरून केलेल्या टीकेमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,   "कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी" अशी मराठीत एक म्हण आहे. पण महायुती सरकारने "निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण" अशी नवी म्हण रुढ केली आहे. कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतक-यांची मते घेतली सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नाही चूपचाप पैसे भरा असे मस्तवालपणे सांगत आहेत. विविध कारणे देऊन सातत्याने लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले जाते आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारकडूत फक्त जनतेचा विश्वासघात आणि फसवणूकच सुरू आहे,, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.  

Web Title: "The Mahayuti government has adopted a new saying, 'Farmers for elections and beloved sisters for votes'", says Congress State President Harshwardhan Sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.