NCP आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त विधान भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:23 PM2022-04-21T18:23:03+5:302022-04-21T18:23:33+5:30

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परशुराम सेवा संघाकडून करण्यात आली आहे

The Parashuram Seva Sangha has demanded that a case be registered against NCP Amol Mitkari | NCP आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त विधान भोवणार?

NCP आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त विधान भोवणार?

googlenewsNext

नवी मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे केलेल्या सभेत हिंदु धर्माची प्रथा कन्यादान यावरुन वादग्रस्त विधान केले. त्यावरून राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून केली जात आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयसमोर आंदोलन केले. त्यानंतर आता अमोल मिटकरींविरोधात वाशी येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवल्याप्रकरणी एकीकडे राज्यभरात ब्राह्मण समाजाने त्यांचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील परशुराम सेवा संघाकडून वाशी पोलीस ठाण्यात अमोल मिटकरींविरोधात तक्रार नोंदवली आहे. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परशुराम सेवा संघाकडून करण्यात आली आहे. मिटकरी यांनी जाहीर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुस्लीम किंवा अन्य धर्मगुरुंची टिंगल करण्याची हिंमत होत नाही - भाजपा

अमोल मिटकरी यांच्या विधानावर टीका करताना भाजपाने राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते. अमोल मिटकरी व्यासपीठावरून पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लाऊन समाजाचे तुकडे करण्यात रस आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीविरुद्ध ब्राह्मण महासंघ

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले

Web Title: The Parashuram Seva Sangha has demanded that a case be registered against NCP Amol Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.