'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 07:58 PM2022-07-31T19:58:59+5:302022-07-31T20:00:01+5:30

'बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या फोटोवर निवडणूक लढवली, पण...'

'The people elected the BJP-Shivsena alliance, but they formed the Mahavikas Aghadi', says Eknath Shinde | 'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात

'जनतेने युतीला निवडून दिले, पण यांनी आघाडी स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा घणाघात

googlenewsNext

सिल्लोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडंखोरी केल्यापासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच, शिंदे गटाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेअब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, गेल्या काही काळात घडलेल्या सर्व घटनांवर भाष्य केले. 

'जनतेने युतीला निवडून दिले होते'
सिल्लोडच्या जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, 'आम्ही शिवसेना आणि भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली होती. एकीकडे बाळासाहेबांचा आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता. हिंदुत्वाचा एक विचार घेऊन पुढे गेलो होतो. त्यामुळेच जनतेने भाजपचे 106 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. पण, नंतर काय झालं? काही लोकांची वक्तव्ये आली- आम्हाला अनेक दरवाजे मोकळे आहेत. ती कशाची सुरुवात होती?' असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.

'आघाडी करू नका असं आम्ही म्हणालो होतो'
ते पुढे म्हणाले की, 'मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते. पण, तसं झालं नाही. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, ही अशी आघाडी करू नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं,' अशी माहिती शिंदेंनी दिली. 

Web Title: 'The people elected the BJP-Shivsena alliance, but they formed the Mahavikas Aghadi', says Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.