मोठी बातमी! सोन्या-चांदीचा दर उतरला; जाणून घ्या कसा आहे आजचा दर

By काशिनाथ वाघमारे | Published: July 25, 2023 03:18 PM2023-07-25T15:18:45+5:302023-07-25T15:19:11+5:30

कोरोनानंतर सोने-चांदीचा दर अस्थिर राहिलेला आहे. अशाही काळात गृहिणींचा, तरुणाईचा प्रतिसाद मिळतोय.

The price of gold and silver fell; Find out how the rate is today | मोठी बातमी! सोन्या-चांदीचा दर उतरला; जाणून घ्या कसा आहे आजचा दर

मोठी बातमी! सोन्या-चांदीचा दर उतरला; जाणून घ्या कसा आहे आजचा दर

googlenewsNext

सोलापूर - गृहिणी अन् तरुणींचा चढ-उतरणीच्या काळात ओढा राहिलेल्या सोन्याचा भाव मे-जूनदरम्यान चार हजारांनी उतरला अन् दोन महिन्यांत हजाराने वधारत गेला; मात्र चांदी याच काळात पाच हजारांनी आपटून दोन महिन्यांत पाच हजारांनी उसळी घेतली. या उसळीचा सोलापूरच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. याही काळात सोने खरेदीकडे कल राहिला. मागील पंधरा दिवसांत अधिकमासामुळे चांदी खरेदीकडे कल अधिक राहिला.

कोरोनानंतर सोने-चांदीचा दर अस्थिर राहिलेला आहे. अशाही काळात गृहिणींचा, तरुणाईचा प्रतिसाद मिळतोय. त्यानंतर रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला. याबरोबरच अमेरिकेची मंदीकडे वाटचाल सुरू असून, आंतरराष्ट्रीय पॉलिसी बदलतेय. या साऱ्यांचा परिणाम म्हणून भारतात सोने-चांदीच्या दरावर होता असल्याचे सोलापुरातील सराफा व्यावसायिकांचे मत आहे.

सोने घसरत राहिले, चांदीने उसळी घेतली
११ मे : ६२,०००-७६,०००
३० जून : ५८,४००-७१,०००
१ जुलै : ५८,५००-७१,०००
७ जुलै : ५९,०००-७२,०००
१२ जुलै : ५९,७००-७५,०००
१९ जुलै : ६०,२००-७८,०००
२४ जुलै : ५९,८००-७६,०००

धोंडा महिन्यात चांदीला मागणी...
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात अर्थात धोंडा महिन्यात जावई आणि लेक, सुनेला चांदीच्या वस्तू देऊन त्यांचा मान-सन्मान वाढविण्याची प्रथा पाळली जात आहे. या पंधरा दिवसांत चांदीचे निरंजन ताटसह ब्रेसलेट, चेन, जोडवी, छल्ला यांची खरेदी होतेय. याबरोबरच मुलींचा ओढा चार ग्रॅमच्या फॅन्सी टॉप्सकडे, तर श्रीमंत कुटुंबाकडून जावयाला सोन्याची अंगठी दिली जात आहे.

Web Title: The price of gold and silver fell; Find out how the rate is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.