तीन दिवस भरगच्च कार्यक्रम! दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:34 IST2025-02-14T11:33:30+5:302025-02-14T11:34:32+5:30
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 schedule: तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे.

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम! दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
पुणे : नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर झाली आहे. ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्य संमेलन रंगणार आहे. अभिजात मराठी भाषेचा जागरही संमेलनात होईल.
तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे.
शुक्रवारी (दि.२१) दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर उपस्थित राहतील.
संमेलनस्थळी महात्मा जोतिराव फुले सभामंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप, यशवंतराव चव्हाण सभामंडप असतील. संमेलनाचा समारोप रविवारी (दि.२३) सायंकाळी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मराठी भाषामंत्री उदय सामंत, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहतील.
संमेलनात शुक्रवारी होणारे कार्यक्रम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप
ग्रंथदिंडी प्रारंभ (सकाळी ९:३०)
उद्घाटन सत्र दुसरे (सायंकाळी ६:३०) - उपस्थिती - सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, ॲड. आशिष शेलार, पूर्वाध्यक्ष भाषण
डॉ. रवींद्र शोभणे - अध्यक्षीय भाषण - डॉ. तारा भवाळकर.
निमंत्रितांचे कविसंमेलन - अध्यक्ष - इंद्रजित भालेराव (सायंकाळी ७:३०)
खुले अधिवेशन आणि समारोप
२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात खुले अधिवेशन होईल. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील सहभागी होतील. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.
मुलाखत - मराठी पाऊल पडते पुढे (सकाळी १०)
परिसंवाद - विषय - मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार (दुपारी १२)
विशेष सत्कार - संजीवनी खेर, दत्तात्रय पाष्टे, कमल पाष्टे - हस्ते - उषा तांबे (दुपारी २)
लोकसाहित्य, भूपाळी ते भैरवी कार्यक्रम (दुपारी २:३०)
परिसंवाद - विषय - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब (दुपारी ४), सहभाग : सुरेश भटेवरा, संजय आवटे, शैलेश पांडे, समीर जाधव, धीरज वाटेकर.
मधुरव कार्यक्रम (सायंकाळी ६)
संमेलनात शनिवारी (दि. २२) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)
बहुभाषिक कविसंमेलन (दुपारी १२:३०)
परिचर्चा - आनंदी गोपाळ (दुपारी २:३०)
परिसंवाद - विषय - बृहन् महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन आणि साहित्य (सायंकाळी ४)
संमेलनात २३ फेब्रुवारीला होणारे कार्यक्रम
असे घडलो आम्ही (सकाळी १०)
परिसंवाद - विषय - सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य (दुपारी १२)
परिसंवाद - विषय - नाते दिल्लीशी मराठीचे (दुपारी २:३०)
संमेलनात रविवारी (दि. २३) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)
परिसंवाद - विषय - अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत (सकाळी १०)
परिसंवाद - विषय - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता (दुपारी १०)
महात्मा जोतिराव फुले सभामंडपातही विविध कार्यक्रम रंगणार आहेत. शनिवारी (दि. २२) कवी कट्टा सकाळी ९ ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत आयोजित केला आहे. रविवारी (दि.२३) कवी कट्टा सकाळी ९:३० ते दुपारी १ आणि दुपारी १ ते २ या वेळेत होईल.