नऊ महापालिकांमधील आरक्षण सोडत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 11:34 PM2022-08-04T23:34:16+5:302022-08-04T23:34:16+5:30
अन्य १४ मनपाच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क | मुंबई: राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारी नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता पुढील ९ महापालिकांसाठीची आरक्षण सोडत उद्या काढण्यात येणार नाही.
१ औरंगाबाद
२ नांदेड- वाघाळा,
३ लातूर
४ परभणी
५ चंद्रपूर
६ भिवंडी- निजामपूर
७ मालेगाव
८ पनवेल
९ मीरा-भाईंदर
तसेच, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १४ महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.