“निकालावर चर्चा करता येत नाही, नवं चिन्ह घ्यायचं असतं...”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:35 PM2023-02-17T22:35:48+5:302023-02-17T22:36:11+5:30

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

The result cannot be discussed a new sign has to be taken Big statement of Sharad Pawar shiv sena maharashtra politics | “निकालावर चर्चा करता येत नाही, नवं चिन्ह घ्यायचं असतं...”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“निकालावर चर्चा करता येत नाही, नवं चिन्ह घ्यायचं असतं...”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“निकाल लागल्यावर त्यावर काही चर्चा करता येत नाही. त्याला स्वीकारायचं आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणाम होत नसतो,” असं शरद पवार म्हणाले. एकदा काँग्रेसमध्ये एकदा हा वाद झाला, त्यावेळचं चिन्ह गेलं त्यानंतर काँग्रसने हात घेतला. ते लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह घेतील ते लोक मान्य करतील. १०-१५ दिवस चर्चा होईल, त्याचा फारसा परिणाम होत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विचार आहे. जे कोण आज बोलतायत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असं म्हटलं जातं. ही दुटप्पी भूमिका घेतायत त्यांना त्यांची जागा निकालानं दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “त्यांनी यापूर्वीच घनुष्यबाण गोठवलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: The result cannot be discussed a new sign has to be taken Big statement of Sharad Pawar shiv sena maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.