‘समृद्धी’चा दुसरा टप्पा २६ मेपासून हाेणार सुरू; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार लाेकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 06:14 AM2023-05-23T06:14:53+5:302023-05-23T06:15:03+5:30
‘समृद्धी’च्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपूर आणि मुंबईला वेगाने जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा ८० किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा २६ मेपासून खुला होणार आहे. या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यासाठी जंगी तयारी सुरू केली आहे.
‘समृद्धी’च्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या पहिल्या टप्प्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर भरवीर ते नागपूर अंतर सहा तासांत पार करणे शक्य होणार आहे.
जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण महामार्ग होणार खुला
n समृद्धीचा तिसरा टप्पा हा भरवीर ते भिवंडी असा आहे. संपूर्ण महामार्ग हा जुलै २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
n मात्र, तिसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी असल्याने संपूर्ण महामार्ग खुला होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.